बुद्ध लेणी येथे धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमत्त विविध कार्यकमांचे आयोजन

Foto
छत्रपती संभाजीनगर ( सांजवार्ता ब्युरो ): धम्म चक्र अनुप्रवर्तन दिनानिमित आज विद्यापीठ परिसरात असलेल्या बुद्ध लेणी येथे उपासकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.सकाळी भदंत विशुद्धानंद बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली भंते नागसेन बोधी, भदंत  संघप्रिय , भदंत आर.आनंद यांनी विपश्‍यना, बुद्ध वंदना, धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर धम्म देसना, प्रवचन झाले. आज सकाळपासून लेणी परिसरात मराठवाड्यातून बौद्ध उपासक आले. त्यांनी तेथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.तसेच मेणबत्ती व अगरबत्ती लावून पूजन केले.  

या  कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच पालकमंत्री संजय शिरसाट, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे , खासदार कल्याण काळे  व आमदार हजर राहणार आहेत. सकाळपासून उपासकानी गर्दी केल्याने लेणी परिसर बहरून गेला होता. येथे येणाऱ्या उपादकांसाठीदी.बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर असोसिएशन , क्षमा हेल्थ केअर फाउंडेशन आणि आंबेडकर मिशन दवाखाना यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.  बाहेर गावावरून येणाऱ्या उपासकांसाठी विविध पक्ष आणि संघटना यांनी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होतो. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.